esakal | Ganesh Visaejan 2020 : राज्यात गणेश विसर्जन करताना 16 जण बुडाले 
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Visarjan 2020: 16 people drowned while immersing Ganesh in Akola News State

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव बळावू नये यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम, अटी आणि सोशल डिस्टंन्सींग पाळत राज्यभरात गणेश विसर्जन पार पडले. दरम्यान, सर्व खबरदारी घेऊनही गणेश विसर्जन  करताना आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 16 ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत.

Ganesh Visaejan 2020 : राज्यात गणेश विसर्जन करताना 16 जण बुडाले 

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव बळावू नये यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम, अटी आणि सोशल डिस्टंन्सींग पाळत राज्यभरात गणेश विसर्जन पार पडले. दरम्यान, सर्व खबरदारी घेऊनही गणेश विसर्जन  करताना आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 16 ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत.

पुणे, जळगाव, नाशिक आणि अकोला या ठिकाणी एकूण 16 जण बुडाल्याचे वृत्त आहे. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला. तर तिघांचे प्राण वाचविण्यास मदत आणि बचाव पथक तसेच उपस्थित गणेशभक्तांना यश आले. दोघे जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार अकोला येथेही घडली असून, गणपती विसर्जन करत असताना दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हे दोन्ही तरुण अकोला शहात असलेल्या बाळापूर येथील राहणारे असल्याचे समजते.

तर दुसरी घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील तापी नदी पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरलेले 5 तरुण पाण्यात बुडाले. त्यापैकी 3 जणांचे प्राण वाचविण्यात स्थानिकांना यश आले. तर उर्वरीत 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यातही गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. नाशीक येथे गणपती विसर्जनात गेलेल्या 5 तरुणांचा मृत्यू झाला आहे. या पाचपैकी चार जण गणपती विसर्जनासाठी नदीत उतरले होते. तर आणखी एक जण विहीरीत उतरला होता. आणखी एक तरुण तर सेल्फी घेत असताना पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला.

अशीच दुर्घटना पुणे येथे गणपती विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. कृष्णा मारुती लोकरे ( वय 18) असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते.

गणपती विसर्जन करताना पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षीच घडत असतात. राज्य सरकार, पोलीस दल आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, संघटना यांनी सावधानतेचा इशारा दिलेला असताना आणि जनजागृती केलेली असतानाही अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.

Ganesh Visaejan 2020 :  

loading image