esakal | परदेशात गणेशोत्सवाची धूम
sakal

बोलून बातमी शोधा

युरोप अमेरिकेत गणेशउत्सव

परदेशात गणेशोत्सवाची धूम

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : परदेशात सातासमुद्रापार राहणाऱ्या उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेल्या मराठी विद्यार्थ्यांनी जर्मनी आणि अमेरिकेत श्री गणेशाची प्रतिष्ठपणा केली. आनंदात बाप्पांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. सध्या त्यांच्या घरी दहा दिवस साग्रसंगीत यंदाच्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नाशिक शहरातील नावाजलेल्या महाविद्यालयातील प्राविण्य मिळवलेले हे सर्व विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जर्मन विद्यापीठात निवड झालेले आहेत. अमृता कडुलकर , सुमित कदम, सना दिवाडकर, तेजस तलाठी (पिंपरी चिंचवड, पुणे), आदिती ठाकरे(नाशिक), स्वप्निल देशमुख (औरंगाबाद), करण गंगनानी(वडोदरा) यांनी मानहाइम बाडेन या(व्युर्टेंबर्ग राज्य जर्मनी) या शहरात संयुक्त पणे निवासस्थानी गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली. ऋतुजा पारखी(चिंचवड) या विद्यार्थिनींने मिशिगन डिअर बॉर्न (अमेरिका)येथे गणेश प्रतिष्ठापना केली. सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्हीडिओ कॉल करून सांगितले. दिवसेंदिवस परदेशातील गणेशोत्सव अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी त्याची नाळ ही नेहमीच त्याच्या मातीशी जोडलेली असते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

घरगुती उत्सवाची माहिती देताना अमृता कडुलकर म्हणाली, ‘‘शिक्षणनिमित्ताने ५ महिन्यापूर्वी शहर सोडून जर्मनीत स्थायिक झाले आहे. पण श्रावण संपताच आम्हाला बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात. येथे गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असतात. यंदा माझ्या छोट्या मुलाच्या पसंतीची मूर्ती आम्ही घरी आणली. पारंपरिक उत्साहात श्रींची प्रतिष्ठापना केली.

ऋतुजा पारखी म्हणाली,‘‘ मोदक, लाडूंचा प्रसाद, दहा दिवस भारतीयांच्या घरी मोठा सण असतो. आरतीला एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याची प्रथा इकडे रूढ झाली आहे. मातृभूमीपासून साता समुद्रापार दूर आहोत, आम्ही आमचे सण, उत्सव विसरू शकणार नाही.आम्हाला भारतीय संस्कृतीतील बंधुभाव,विश्व ऐक्य भावना सतत प्रेरणा देत असते. ’’

हेही वाचा: उज्वल निकमांचा राजकारण्यांना टोला;पाहा व्हिडिओ

सुमित कदम म्हणाली,‘‘आम्ही श्री गणेशाच्या टिकाऊ आणि सुबक मूर्ती भारतातून इकडे आणल्या आहेत, आम्हाला सर्व आरत्या पाठ आहेत.जगातील आणि आमच्या देशातील कोरोना महामारी लवकर समाप्त होईल,सर्वांना आरोग्य आणि निर्मळ जीवन प्राप्त व्हावे,अशी आम्ही प्रार्थना केली आहे. ’’

loading image
go to top