मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या धक्क्याने पित्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

यवत : खामगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका मजूर तरूणीवर याच गुऱ्हाळाचा परप्रांतीय ठेकेदार व इतर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेची मिळाल्यानंतर पीडित तरूणीच्या वडिलांचा आज हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबतची माहिती यवत पोलिसांनी दिली. 

खामगाव येथील गुऱ्हाळावर पीडित तरूणी व तिचे कुटुंबीय मजूर म्हणून काम करत होते. या गुऱ्हाळाचा ठेकेदार नदीन याने पीडितेला 10 आक्टोबर रोजी कासुर्डी गावच्या हद्दीतील एका शेतात बोलावून घेतले. तेथे नदीम याचा भाऊ मोहसीन व साथीदार दिलवाज फुरकांन (तिघेही रा. उत्तराखंड) या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. हा प्रकार समजल्यावर पीडितेच्या वडिलांनी संबंधितांना जाब विचारला. मात्र, त्यामुळे चिडून जाऊन आरोपींना पीडितेच्या संपूर्ण कुटुंबाला काही दिवस डांबून ठेवले होते.

17 ऑक्टोबर रोजी त्यांना सात हजार पाचशे रूपये देऊन दौंड येथून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसवून दिले आणि कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र संबधित पीडितेने आपल्या गावी गेल्यावर कुटुंबीयांसोबत जाऊन गंगाहर पोलिस स्टेशन (ता. रूडकी, जि. हरिद्वार, राज्य उत्तराखंड) येथे संबंधितांविरूद्ध फिर्याद दिली. 0 क्रमांकाने ही फिर्याद यवत पोलिसांकडे पाठवण्याच आली. त्यावरून तपास करत यवत पोलिसांनी मोहसीन व दिलवाज यांना अटक केली.

दरम्यान, पीडिता व तिचे वडील काल यवत पोलिस ठाण्याला आले. मात्र, प्रचंड मानसिक त्रासाने आज सकाळी त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे पुढील तपास करीत आहेत.
 
Web Title: Gang Rape in Kasurdi Victims father Death