esakal | दिवा-रत्नागिरी, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू; रेल्वे प्रशासनाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan

दिवा-रत्नागिरी, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganpati Festival) कोकणात (konkan) जाण्यासाठी दिवा-रत्नागिरी (Diva -Ratnagiri express) पॅसेंजर आणि दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस (Diva-Sawantwadi) चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने (konkan railway) घेतला आहे. यासह रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस, मडगाव-सावंतवाडी या गाड्या कोकण रेल्वे चालविणार आहे. त्यामुळे दिवा येथून चाकरमान्यांना (Konkan commuters) कोकणात जाण्यासाठी या दोन गाड्यांचा उपयोग होईल. यामधील गाड्या 6 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालवधीपर्यंत चालविण्यात येणार आहेत.

हेही वाचा: एमपीएससीच्या परीक्षार्थींना लोकल प्रवास खुला; हॉल तिकीट दाखवून मिळणार तिकीट

गाडी क्रमांक 01504 / 01503 रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी दैनंदिन पॅसेंजर विशेष गाडी (पूर्ण आरक्षित) चालविण्यात येणार आहे. 7 सप्टेंर ते 30 सप्टेंबर रोजीपर्यंत ही गाडी रत्नागिरी येथून पहाटे 5.30 वाजता सुटेल. तर, ही गाडी त्याच दिवशी दिवा येथे दुपारी 1.25 वाजता पोहचले. गाडी क्रमांक 01503 दिवा येथून दुपारी 3.30 वाजता सुटेल. तर, रत्नागिरी येथे रात्री 12.20 वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक 01506 / 01505 सावंतवाडी रोड -दिवा-सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेस (पूर्ण आरक्षित) 7 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान सावंतवाडी रोड येथून सकाळी 8.20 वाजता सुटेल. ही गाडी दिवा येथे रात्री 8.10 वाजता पोहचेल. तर, गाडी क्रमांक 01505 8 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या दरम्यान दिवा येथून सकाळी 6.55 वाजता सुटून सावंतवाडी रोड येथे रात्री 6.55 वाजता पोहचेल.

हेही वाचा: केंद्रशासित दमण मध्ये घुमला 'जय भवानी जय शिवाजी'चा गजर

गाडी क्रमांक 01501 / 01502 रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी दैनंदिन एक्स्प्रेस (पूर्ण आरक्षि) गाडी 6 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत चालविण्यात येईल. ही गाडी रत्नागिरी येथून मध्यरात्री 1.40 वाजता सुटेल. तर, मडगाव येथे रात्री 8.50 वाजता सुटेल. 8 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत गाडी क्रमांक 01502 मडगाव येथून सायंकाळी 7.40 वाजता सुटेल. ही गाडी रत्नागिरी येथे मध्यरात्री 1 वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक 01508 / 01507 मडगाव ते सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेस (पूर्ण आरक्षित) गाडी 7 ते 30 सप्टेंबरपर्यंत चालविण्यात येईल. ही गाडी मडगाव येथून सकाळी 6.25 वाजता सुटेल. तर, सावंतवाडी रोड येथे सकाळी 8.15 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 01507 सावंतवाडी रोड ते मडगाव 8 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत चालविण्यात येईल. ही गाडी सावंतवाडी रोड येथून सायंकाळी 7 वाजता सुटेल. तर, मडगाव येथे रात्री 9.30 वाजता पोहचेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

loading image
go to top