कचऱ्याची प्रक्रिया यंत्रे साखळदंडात जखडली 

कचऱ्याची प्रक्रिया यंत्रे साखळदंडात जखडली 

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला सात महिने उलटले आहेत; मात्र महापालिका प्रशासनाची तारेवरची कसरत सुरूच आहे. पडेगाव, हर्सूल येथे पडून असलेल्या हजारो टन कचऱ्याचे ढीग कमी करण्यासाठी यंत्रे बसविण्यास परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे; तर केवळ चिकलठाण्यात सध्या काम सुरू आहे. त्यामुळे महापालिकेला 25 दिवसांपूर्वी मिळालेली कचराप्रक्रिया यंत्रे मध्यवर्ती जकात नाक्‍यावर साखळदंडात ठेवली आहेत. 

नारेगाव (मांडकी) येथील नागरिकांनी 16 फेब्रुवारीपासून कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. सात महिने उलटले असले तरी महापालिकेला अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही. महापालिकेने प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येकी तीन अशा 27 यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यातील नऊ यंत्रे 22 ऑगस्टला मिळाली. सध्या हर्सूल व चिकलठाणा येथे पडून असलेल्या कचऱ्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र यंत्रे बसविण्यासाठी आवश्‍यक असलेली कामेदेखील नागरिक करू देत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे. सध्या फक्त चिकलठाणा येथे काम सुरू आहे. 

विभागीय आयुक्त घेईना दखल 
जागा अंतिम करून देण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीवर आहे; मात्र या समितीची गेल्या दीड दोन महिन्यांपासून बैठकच झालेली नाही. त्यामुळे महापौरांनी विभागीय आयुक्तांना पत्र दिले आहे; मात्र अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com