कचऱ्याचा शहरांना फास

माधव इतबारे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - कचऱ्याच्या भस्मासुराचा राज्यातील प्रमुख शहरांना विळखा पडत आहे. महापालिका प्रशासन ‘डोअर टू डोअर कलेक्‍शन,’ ओल्या व सुक्‍या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरत असल्याने डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याचे अक्षरक्षः डोंगर उभे आहेत. त्यामुळे शहर परिसरातील हवा, जमिनीतील पाण्याचे साठे दूषित होताहेत; दुसरीकडे डास, माशा, उंदीर, श्‍वानांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सरकारचे आदेशही पायदळी तुडविले जात आहेत. 

औरंगाबादेत कचराकोंडी 
औरंगाबाद शहरात रोज सुमारे ४५० टन कचरा जमा होतो. त्यावर प्रक्रियाच होत नसल्याने नारेगाव कचरा डेपोवर सुमारे २० लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे. नारेगाव परिसरातील नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून कचरा डेपोविरोधात आंदोलन सुरू केलंय. तेव्हापासून पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल येथे कचराप्रक्रिया केंद्रांच्या जागेवर कचरा टाकला जातोय. सरकारने ९१ कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन डीपीआर तयार केला असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. 

कचऱ्यासाठी डंपिंग यार्डही अपुरा 
नागपूर - शहरात रोज १२०० टन कचरा कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीमार्फत गोळा केला जातो. मात्र, त्यावर प्रक्रियेचा बोजवारा उडालाय. भांडेवाडी येथील डंपिंग यार्ड भरले असून, कत्तलखान्यासाठी राखीव जागेवर कचरा साठविला जातोय. दररोज केवळ २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होते, तर दररोज एक हजार टन कचरा प्रक्रियेविना राहात असल्याने त्याचे डोंगर होत आहेत. महापालिकेने नुकतेच कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. 

तीनशे टन कचऱ्याची विल्हेवाट 
सोलापूर - शहरात रोज जमा होणाऱ्या तीनशे टन कचऱ्यापासून तुळजापूर रस्त्यावरील वीजनिर्मिती प्रकल्पात रोज तीन मेगावॉट विजेची निर्मिती होते. कचरा गोळा करण्यासाठी १०५ घंटागाड्या सकाळ आणि दुपार शहराच्या विविध भागांत फिरतात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्मार्ट सिटी कंपनीतर्फे ओला व सुका कचरा साठविण्यासाठी महापालिका एक लाख कुटुंबीयांना डबे देणार आहे, असे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले. 

Web Title: garbage issue in city