सत्ता बदलासाठी सज्ज व्हा - जिग्नेश मेवाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असून सत्ताबदल झाला पाहिजे. हा बदल घडवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन गुजरातमधील दलित नेता आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले. लोकांचे दोस्त या संघटनेच्या वतीने काल दुपारी शिवाजी पार्क ते चैत्यभूमीदरम्यान काढलेल्या भाजपविरोधी रॅलीत आमदार मेवाणी सहभागी झाले होते.

लोकांचे दोस्त आणि समविचारी लोकशाहीवादी सामाजिक आणि राजकीय संस्था, संघटनांच्या वतीने आज स्वातंत्र्यदिनी ‘तिरंगा उठाव आणि भाजप हटाव’ रॅलीचे आयोजन केले होते. शिवाजी पार्क येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. 

आमदार मेवाणी यांनी चैत्यभूमीवर रॅली दाखल झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, या वेळी ते बोलत होते. भाजप आणि मोदी सरकारविरोधात त्यांनी जोरदार टीका केली.

सर्व पातळ्यांवर सरकार अपयशी
देशात बेरोजगारी कमी होत नाही, गुन्हे वाढत आहेत. देश अराजकाकडे चालला आहे, सगळ्याच पातळ्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता बदल झाला पाहिजे, या बदलासाठी रणनीती आखण्याची गरज आहे. पुढच्या निवडणुकीत सत्ताबदल झाला तरच देशाला विकासाच्या दिशेने नेता येईल, असे मत मेवाणी यांनी व्यक्त केले.       

पुजारीची धमकी 
जिग्नेश मेवानी म्हणाले की, मला व उमर खालिदला जीवे मारण्याची धमकी रवी पुजारी देत आहे. याची तक्रार करूनही पोलिसांकडून दखल घेतली जात नाही. फक्त गुजरातमध्ये एक पोलिस माझ्यासाठी तैनात करण्यात आला आहे; पण गुजरात बाहेरच्या सुरक्षेचे काय?

जुमल्यांचा बाजार
‘देशातील नागरिकांचे प्रश्‍न वाढत चालले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाषणबाजी करीत सुटतात. त्यांची भाषणबाजी म्हणजे केवळ जुमल्यांचा बाजार आहे’, अशी टीका आमदार जिग्नेश मेवानी यांनी केली.

Web Title: Get ready for a change says Jignesh Mevine