संप मागे घ्या अन्यथा कारवाई - गिरीश बापट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - रेशन दुकानदारांनी सरकारी नोकरीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. या दुकानदारांनी संप मागे घेऊन मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहावे; अन्यथा कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

राज्यात पाच हजार दोनशे रेशन दुकाने आहेत. त्यातील चार हजार 300 दुकाने संपात सहभागी झाली होती. त्यातील रायगड जिल्ह्यातील दोन हजार 361 दुकानदारांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे हा संप बारगळला आहे. आझाद मैदानावर रेशन दुकानदारांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी त्यांना संप करू नका, अशी विनंती केली होती. दोन-तीन वर्षांत रेशन दुकानदारांच्या समस्यांचा आम्ही अभ्यास केला आहे. रेशन दुकानांमध्ये पॉझ मशिन बसविल्यामुळे अनुचित प्रकार थांबले आहेत. तसेच द्वारपोच योजनेमुळे रेशन दुकानदारांना आता गोदामातून धान्य आणावे लागत नाही. त्यामुळे आता धान्याची तूट निर्माण होत नाही. काही रेशन दुकानदारांनी केवळ धान्याच्या विक्रीने आम्हाला अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याची तक्रार केली होती, त्यावर आम्ही रेशन दुकानांमध्ये भाजीपाला, शेतीचे बियाणे आदी विक्री करण्याला अनुमती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: girish bapat take back strike Otherwise action