जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर दिपाली सय्यद यांचे उपोषण मागे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा असलेल्या साकळाई पाणी योजनेसाठी शिवसंग्राम पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री दिपाली सय्यद आमरण उपोषणाला बसल्या होत्या. अखेर पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दुरध्वणीवरून झालेल्या चर्चेनंतर दिपाली सय्यद यांनी उपोषण मागे घेतले.

नगर : जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा असलेल्या साकळाई पाणी योजनेसाठी शिवसंग्राम पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री दिपाली सय्यद आमरण उपोषणाला बसल्या होत्या. अखेर पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दुरध्वणीवरून झालेल्या चर्चेनंतर दिपाली सय्यद यांनी उपोषण मागे घेतले.

सांगली-कोल्हापुरातली पूरपरिस्थिती निवळल्यानंतर आपण मुंबईत एक बैठक घेऊन साकळाईचा मुद्दा मार्गी लावू, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिपाली सय्यद यांना दिलं असून त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

साकळाईचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू, असा विश्वास मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या अगोदर साकळाई योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलं नाही, असा आरोप सय्यद यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girish mahajan assured to Deepali Sayyad about Sakalai Project