Girish Mahajan : डॉक्टरांकडून देण्यात येणाऱ्या बोगस रिपोर्टचा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनाच फटका | Girish Mahajan responded about fake medical reports by Doctors | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Mahajan
Girish Mahajan : डॉक्टरांकडून देण्यात येणाऱ्या बोगस रिपोर्टचा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनाच फटका

Girish Mahajan : डॉक्टरांकडून देण्यात येणाऱ्या बोगस रिपोर्टचा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनाच फटका

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. आपल्याला डॉक्टरांकडून देण्यात आलेल्या बनावट रिपोर्टचा फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच सध्याच्या कायद्यामध्ये त्रुटी असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज आमदार सचिन अहिर यांनी बोगस डॉक्टरांचा विषय उपस्थित केला आहे. त्याला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे. त्यांच्या भावाला कॅन्सर असल्याचा रिपोर्ट बोगस डॉक्टरांनी दिल्याचं महाजनांनी सांगितलं.

महाजन म्हणाले,"ग्रामीण भागात लॅब चालवण्याची परवानगी नसताना देखील चालवत आहेत. शिवाय काहीही रिपोर्ट देतात. माझ्या भावाचा तर लिव्हरचा कॅन्सर असल्याचा बोगस रिपोर्ट जळगावमध्ये दिला होता. मुंबईत त्याचे परत चेकअप केले तेव्हा कॅन्सर नसल्याचे समोर आले.

राज्यात बंगालचे आणि बिहारचे बोगस डॉक्टर मोठया प्रमाणात राज्यांत आहेत. त्यांची आकडेवारीही महाजन यांनी सादर केली. मुंबईत २०२० मध्ये २५, २०२१ मध्ये ११ आणि २०२२ मध्ये १२ अशा एकूण ३८ बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यात ३ बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्यात आली. तर भिवंडीत सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :girish mahajan