तर बारामती नगर पालिकाही जिंकून दाखवीन : गिरीश महाजन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 जानेवारी 2019

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती पालिकाही जिंकून दाखवू असा विश्वास जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला. 

जळगाव : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती पालिकाही जिंकून दाखवू असा विश्वास जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला. 

महाजन आज आपल्या मतदार संघातील जामनेर दौऱ्यावर होते. जामनेर तालुक्‍यात एका कार्यक्रमात त्यांनी "बारामती'तही आपण जिंकू असे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता महाजन म्हणाले, आपण "बारामती'त लढणार असे आपण बोललो नाही, मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणूक व चार महापालिका प्रमाणेच बारामती पालिका निवडणूकीची जबाबदारी पक्षाने आपल्याकडे दिली तर त्या ठिकाणीही नियोजन करून आपण विजय मिळवून दाखवू. आपण निवडणूकीचे नियोजन अत्यंत मायक्रो प्लॅनिंग असते त्यामुळेच हे यश मिळते. 

युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात 
भाजपला राज्यात युती हवीच आहे,असे मत व्यक्त करून ते म्हणाले, कि राज्यात युती झाल्यास दोन्ही पक्षाला फायदा होणार आहे. त्यामुळे युती आवश्‍यक आहे, भाजप वरीष्ठ नेतेही त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमची तयारीही आहे, आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात आहे. 

Web Title: girish mahajan says then i wil win baramati Corporation Election