मुलीचे अपहरण करून बलात्कार; मुलगी सात महिन्याची गर्भवती

अनिल कांबळे
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

मैत्रिणीच्या घरी पायी जाणाऱ्या 17 वर्षीय मुलीला सहा महिन्यांपूर्वी एका युवकाने बेशुद्ध करून अपहरण केले. तिच्यावर रस्त्याच्या कडेला झुडूपात नेऊन बलात्कार करून आरोपी पळून गेला. ती मुलगी शुद्धीवर आल्यानंतर बदनामीच्या भीतीपोटी मुलीने आईवडीलांना सांगितले नाही. परंतु, आता ती सात महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हा दाखल केला.
 

सदर-  मैत्रिणीच्या घरी पायी जाणाऱ्या 17 वर्षीय मुलीला सहा महिन्यांपूर्वी एका युवकाने बेशुद्ध करून अपहरण केले. तिच्यावर रस्त्याच्या कडेला झुडूपात नेऊन बलात्कार करून आरोपी पळून गेला. ती मुलगी शुद्धीवर आल्यानंतर बदनामीच्या भीतीपोटी मुलीने आईवडीलांना सांगितले नाही. परंतु, आता ती सात महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हा दाखल केला.

पीडित मुलगी चंचल (बदललेले नाव) ही सदरमधील मंगळवार बाजार येथे राहते. 3 मार्च राजी रात्री आठ वाजता चंचल ही मैत्रीणीच्या घरी पायी जात होती. गोंडवाना चौकातून जात असताना मागून एक युवक आला. त्याने तिला अडविले आणि नाकाला रूमाल लावला आणि बेशुद्ध केले. तिला चौकातील झाडाझुडूपात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर तिला रस्त्यावर सोडून तो पळून गेला. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ती शुद्धीवर आली. कुणीतरी लैंगिक अत्याचार केल्याचे लक्षात आले. मात्र, झालेला तिने आईवडीलांना सांगितला नाही. त्यानंतर तीन महिन्यांनंतर गर्भवती असल्याचे मुलीच्या लक्षात आले. मात्र, आईवडीला रागावतील या भीतीने घरी सांगण्याची तिची हिम्मत झाली नाही. त्यानंतर सातव्या महिन्यात तिने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली.

आईने तिला सदरमधील डॉक्‍टरांकडे नेले. डॉक्‍टरांनी गर्भवती असल्याचे सांगितले. आईने तिच्याकडे विचारपूस केली, परंतू ती काही बोलत नव्हती. तिला आईने सदर पोलिस ठाण्यात नेले. तिने लैंगिक अत्याचार झाल्याची कबुली पोलिसांना दिली. 

मुलीची लपवाछपवी? 
चंचल ही बारावीची विद्यार्थिनी असून आरोपी हा तिचा प्रियकर असू शकतो. मात्र, त्याला वाचविण्यासाठी ती नाव सांगत नाही. घटनास्थळाच्या मार्गावर रात्री बारा वाजेपर्यंत वर्दळ राहते. त्यामुळे कुणीतरी येऊन मुलीला बेशुद्ध करण्याची हिम्मत करणार नाही. मुलगी खोटे बोलत असून आईवडीलासह पोलिसांचीही दिशाभूल करीत असल्याची शक्‍यता आहे. ती गर्भवती झाल्यानंतरही सात महिन्यांपर्यंत तिने पालकाला सांगितले नाही, त्यामुळे संशय बळावला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Girl raped by kidnapping The girl is seven months pregnant