तरुणीने मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर फेकला शाईचा फुगा का...

dev.gif
dev.gif

नगर : सध्या सगळेच पक्ष निवडणिकीच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येक पक्षाची यात्रा सध्या सुरु आहे. तशीच भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. यादरम्यान एका तरुणीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरवात झाली. त्याचदरम्यान एका तरुणीने 'सीएम गो बॅक'च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकल्याचा दावा केला आहे.

धक्कादायक म्हणजे तरुणी गाड्याच्या ताफ्याच्या विरुद्ध दिशेला धावत सुटल्याची माहिती मिळाली आहे. शर्मिला येवले असे या तरुणीचे नाव असून, ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता असल्याचे समजते. सरकारचं महापोर्टल बंद करावं, पिचडांना उमेदवारी देऊ नये, राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, ही मागणी करत अकोले येथे शर्मिली येवले या तरुणीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांचा मुख्य ताफा येण्याच्या अगोदर पुढे असलेल्या वाहनावर तिने निळी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. ताफा निघून गेल्यानंतर पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अकोले येथे सभेच्या ठिकाणी दाखल झाला. पोलिसांनी अद्याप संबंधित तरुणीवर कोणतीही कारवाई केली नाही. 

दरम्यान, तिने फेकलेली शाई रोडवर पडलेली दिसत होती. तिच्या मागण्या रास्त असतील, मात्र पद्धत चुकीची वाटते. तिचा अपघात होऊ शकला असता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अकोले येथे हा प्रकार घडला. या प्रकाराची साेशल मिडियात  जाेरदार चर्चा आज दिवसभर सुरु आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com