'समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

- समृध्दी महामार्गाचा शिवसेनेचा विरोध मावळला 
- बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी

मुंबई : शेतकरी व आदीवासींच्या जमिनी संपादित होणार असल्याने शिवसेनेनं नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला आक्रमक विरोध केला होता. आज अखेर हा विरोध मावळला असून शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून राज्याच्या विकासात क्रांतीकारी ठरणाऱ्या या महामर्गाला बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग असे नाव देण्याची विनंती केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी देशातला पहिला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग युती सरकार मधे पुर्ण करून दाखवला. या द्रुतगती मार्गाचे बाळासाहेब यांचे स्वप्न व संकल्पना होती. या महामार्गाला यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या. असे या पत्रात नमूद केले आहे.

हे पत्र एकानथ शिंदे यांनी दिल्याने शिवसेनेची ही अधिकृत भूमिका मानली जात आहे. त्यावरून समृध्दी महामार्गाला शिवसेनेचा असलेला विरोध मावळल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.

Web Title: Give Balasaheb Thackreys name for Samruddhi highway