'बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तेलंगणातील कार्यकर्ते मुंबईत आले होते. बाळासाहेब यांच्याबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देखील भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कारावे, अशी मागणी तेलंगणातील शिवसैनिकांनी केली. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तेलंगणातील कार्यकर्ते मुंबईत आले होते. बाळासाहेब यांच्याबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देखील भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

तेलंगणातील शिवसैनिकांनी आपलं निवेदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. देशाच्या सुरक्षेसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले आयुष्य वेचले. अशा नेत्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

तसेच आज उद्धव याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे निवेदन त्यांना दिले असून, त्यांनीही यात लक्ष घालावे, अशी विनंतीही तेलंगणा येथील शिवसैनिकांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Bharat Ratna Award to Balasaheb Thackeray demand by Shivsena Workers