कर्मवीर भाऊराव पाटील यांना "भारतरत्न' द्या! 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच बहुजन समाजाच्या अनेक पिढ्या ज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघाल्या आहेत. त्यांना मरणोत्तर "भारतरत्न' प्रदान करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्राला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामाविषयी नितांत आदर आहे. त्यांच्या या कार्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नव्हती. जयंत पाटील यांनी अशी पहिल्यांदाच मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे; शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून राज्य सरकारने केंद्राकडे कर्मवीर भाऊराव पाटील यांची "भारतरत्न'साठी शिफारस करावी, अशी विनंती केली आहे.

Web Title: Give Bharat Ratna to Karmaveer Bhaurao Patil