शेतकऱ्यांना कर्जमाफीचे निर्देश सरकारला द्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत व राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमाफीबाबत घोषणा व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. 

या शिष्टमंडळात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, शेकापचे गणपतराव देशमुख, शरद रणपिसे, कपिल पाटील, संजय दत्त, भाई जगताप, डी. पी. सावंत आदी उपस्थित होते. 

या वेळी नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था आणि त्यांना दिलासा देण्यासाठी व आत्महत्या रोखण्याची आवश्‍यकता याकडे राज्यपालांचे लक्ष वेधले.

Web Title: Give farmers the government's debt waiver