गिरणी कामगारांच्या घरांचे पैसे तातडीने द्या 

तेजस वाघमारे
सोमवार, 17 एप्रिल 2017

मुंबई - गिरणी कामगारांना ताबा न दिलेल्या पनवेल तालुक्‍याच्या कोन गावातील घरांचे पैसे तातडीने द्यावेत, असा तगादा "एमएमआरडीए'ने म्हाडाकडे लावला आहे. तसे पत्रच एमएमआरडीएने म्हाडाला पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पनवेल तालुक्‍यातील कोन गावात बांधलेल्या घरांची सोडत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हाडाने काढली. विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया कोणी राबवायची याबाबत एमएमआरडीए आणि म्हाडा अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्यातच घरांचे पैसे देण्याची मागणी एमएमआरडीएने म्हाडाकडे केली आहे. 

मुंबईतील बंद गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गिरण्यांच्या जमिनींवर घरे बांधून ती सोडतीद्वारे काही गिरणी कामगारांना देण्यात आली आहेत, तर मुंबईत विविध ठिकाणी म्हाडा कामगारांसाठी घरे बांधत आहे. सुमारे दीड लाख गिरणी कामगारांना मुंबईत घर देणे शक्‍य नसल्याने सरकारने एमएमआरडीएमार्फत बांधलेली घरे गिरणी कामगारांसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एमएमआरडीएने पनवेल तालुक्‍यातील कोन गावात बांधलेल्या 2417 घरांची सोडत म्हाडाने 2 डिसेंबर 2016 मध्ये काढली. 

या घरांचे वितरण कोण करणार, असा प्रश्‍न चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना अजूनही घरांचे देकारपत्र पाठविण्यात आलेले नाही. याबाबत म्हाडा अधिकारी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करत आहेत; मात्र या प्रश्‍नावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच गिरणी कामगारांना ताबा न दिलेल्या घरांचे पैसे तातडीने द्यावेत, असे पत्र एमएमआरडीएने पाठविल्याने म्हाडा अधिकारी चकित झाले आहेत. एमएमआरडीएच्या पत्राला उत्तर पाठविण्यात येणार असल्याचे म्हाडातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: Give the money urgently mill workers houses