'हक्काची पेन्शन द्या, अन्यथा मोर्चा' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : शारीरिक कष्ट उपसणाऱ्यांना उतारवयात हक्काची पेन्शन द्यावी, अन्यथा ऐन दिवाळीत आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चे काढू, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी दिला. हमाल मापाडी व असंघटित कष्टकऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. शेतीमालास हमीभाव न मिळाल्याने दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांत वाढ होत आहे. सरकारच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे या सर्वांची दुहेरी लूट 20 ते 25 वर्षांपासून सुरू आहे. 

हे सर्व होत असताना सत्ताधारी व विरोधक दोघेही बघ्याची भूमिका घेत आहेत. पेन्शन दिल्यास शेतकऱ्यांसह सर्व अंगमेहनती कष्टकऱ्यांना सन्मानाने जगता येईल, अशा मागण्यांचा जाहीरनामा तयार करण्याचा एक भाग म्हणून 27 ऑक्‍टोबर ते चार नोव्हेंबरदरम्यान राज्य हमाल मापाडी महामंडळातर्फे राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त शनिवारी (ता. 27) शहरातील बाजार समितीच्या शेतकरी भवनात कष्टकऱ्यांची जाहीरनामा परिषद पार पडली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: give pension is our rights otherwise protests