एक हाती सत्ता द्या, चमत्कार घडवतो : राज ठाकरे

एक हाती सत्ता द्या, चमत्कार घडवतो : राज ठाकरे

पुणे : महाराष्ट्रात बदल घडवायचा असेल तर एकहाती सत्ता द्या. मग बघा, मी कसा चमत्कार घडवतो, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच निवडणुका जवळ आल्या आहेत. माझा तोफखाना तयार आहे, असेही ते म्हणाले.

ई-शाळा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात बदल घडवायचा असेल तर एकहाती सत्ता द्या. याशिवाय पुणे महापालिकेत 162 नगरसेवक आहेत. येथेही बदल घडवायचा असेल तर ते तुमच्या सर्वांच्या हातात आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून यापूर्वी अनेकदा अशाप्रकारचे वक्तव्य करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा हे वक्तव्य केले. 

कोणाची फाडायची त्यांची फाडणारच

निवडणुका जवळ आल्या असल्याने मी आता फक्त आचारसंहितेची वाट पाहत आहे. निवडणुका लागल्या की पुण्यात येईन आणि ज्यांची फाडायची, त्यांची फाडेनच, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com