दुधाला तीस रुपये लिटर दर द्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

दूध उत्पादक सोसायट्यांना सध्या देण्यात येत असलेल्या दरात वाढ करून प्रतिलिटर 30 रुपये दर द्यावा, अशी शिफारस जिल्हा परिषदेने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडे केली आहे.

औरंगाबाद : दूध उत्पादक सोसायट्यांना सध्या देण्यात येत असलेल्या दरात वाढ करून प्रतिलिटर 30 रुपये दर द्यावा, अशी शिफारस जिल्हा परिषदेने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडे केली आहे. दूध महासंघातर्फे गावोगावी स्थापन केलेल्या दूध उत्पादक सोसायट्यांना प्रतिलिटर एक ते दोन रुपये दिले जातात. 

जिल्हा परिषदेच्या 21 एप्रिलला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला, की दूध उत्पादक सोसायट्यांना सध्या प्रतिलिटर 21 ते 22 रुपये हा दर परवडत नसल्याने दुधात प्रतिलिटर किमान 30 रुपये, अशी दरवाढ करावी. सभागृहात मंजूर ठरावासह राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांकडे शिफारस करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: Give rs 30 per liters for milk