राज्यातील धरणांमध्ये 83 टक्के पाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

मुंबई : यंदा राज्याच्या सर्वच भागांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. या वर्षी सरासरीच्या 95.8 टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षी याचसुमारास सरासरीच्या 60 टक्के पाऊस पडला होता.

या पावसामुळे भूजलपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. धरणसाठ्यांमध्येही चांगली वाढ झाली आहे. आज रोजी धरणांमध्ये 83.53 टक्के साठा शिल्लक असून, गेल्या वर्षी याचसुमारास तो 42.40 टक्के इतका कमी होता; तसेच "जलयुक्त शिवार अभियानां'तर्गत झालेल्या विविध कामांमुळे ठिकठिकाणची शिवारे जलयुक्त झाली आहेत.

जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा असा :

  • मराठवाडा-77.25 टक्के (5.53)
  • कोकण- 93.22 टक्के (55.47)
  • नागपूर- 66.97 टक्के (43.99)
  • अमरावती- 76.26 टक्के (49.64)
  • नाशिक- 88.17 टक्के (46.58)
  • पुणे- 88.89 टक्के (53).

सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नगर, पुणे, सातारा, सांगली, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती आणि गडचिरोली या वीस जिल्ह्यांत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस; तर सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या 12 जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस; तसेच कोल्हापूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Good monsoon helps Maharashtra in water storage this year