सरकार बदलताच खुशखबर! राज्यात डिसेंबरपासून महाभरती 

recruitment in the state from December
recruitment in the state from December

सोलापूर - शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलिस, महसूलसह अन्य शासकीय विभागांतील 72 हजार रिक्‍त जागांच्या भरतीला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मंत्रालयातील महापरीक्षा कक्षाने कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्या पुढाकाराने त्याचे नियोजन केले आहे. पुढील सहा महिन्यांत ही भरतीप्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा विश्‍वास महापरीक्षा सेलच्या सूत्रांनी व्यक्‍त केला. 

पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षक व परिचर, डॉक्‍टरसह अन्य रिक्‍त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मंडळामधील रिक्‍त पदांचीही भरती डिसेंबरमध्ये होणार आहे. शासकीय कार्यालयांकडून रिक्‍त पदांची माहिती मागविण्यात आली असून, त्यानुसार तब्बल 72 हजार जागांची भरती होणार आहे. 15 डिसेंबरनंतर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. जून 2020 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बहुतांश विभागांतील रिक्‍त पदांची भरती एकाचवेळी केली जाणार आहे. डिसेंबरअखेरीस पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागांमधील रिक्‍त पदांची भरतीप्रक्रिया सुरू होईल, असे नियोजन केले आहे. सरकार स्थापन झाल्याने त्याला गती येईल, असा विश्‍वासही महापरीक्षा कक्षाच्या सूत्रांनी व्यक्‍त केला. 

ठळक बाबी... 
- जून 2020 पर्यंत पूर्ण होणार 72 हजार रिक्‍त जागांची भरती 
- शासकीय विभागांमधील बहुतांश रिक्‍त पदांची एकाचवेळी होणार भरती. सर्वांना मिळणार संधी 
- पशुसंवर्धन विभागातील सुमारे आठ हजार रिक्‍त जागांसाठी तब्बल दीड लाखाहून अधिक अर्ज 

राज्य सरकारच्या विविध कार्यालयांतील रिक्‍त पदांची माहिती मागविण्यात आली असून, महापरीक्षा कक्षाच्या माध्यमातून महाभरतीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होतील, असे नियोजन केले आहे. 
- सीताराम कुंटे, अवर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com