शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 29 जुलै पर्यंत वाढली पीक विमा योजनेची मुदत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे वाजलेले तीनतेरा, वेबसाईटची नादुरुस्ती, ७/१२ आणि ८ अ ची झालेली अडचण अशा एक न अनेक अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारने सदरील योजनेचा सहभाग कालावधी 29 जुलै पर्यंत वाढविला आहे. 

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे वाजलेले तीनतेरा, वेबसाईटची नादुरुस्ती, ७/१२ आणि ८ अ ची झालेली अडचण अशा एक न अनेक अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारने सदरील योजनेचा सहभाग कालावधी 29 जुलै पर्यंत वाढविला आहे. 

सदरील योजनेत सामील होण्यासाठी ७/१२, ८ अ, बँकेचे पासबुक, आधार कार्ड आणि स्वयं घोषित पीक पेरा घेऊन आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

विमा योजनेत तांत्रिकदृष्ट्या चांगले बदल 
या वर्षी केंद्र सरकारने पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तांत्रिकदृष्ट्या खूप चांगले बदल केले आहेत ज्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांला विमा कंपनीमार्फत एसएमएस पाठविला जातो ज्यामध्ये आपला हफ्ता त्यांना मिळाल्याची नोंद आहे तसेच त्या पावतीवर QR CODE देखील छापून येत आहे जो स्कॅन केला असता विम्याची संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होते.- शार्दूल देशपांडे, माहिती अधिकार कार्यकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmers Time extended for pay crop insurance till July 29