गुगल डुडलने उलगडला बाबा आमटेंचा जीवनप्रवास...

बुधवार, 26 डिसेंबर 2018

बाबा आमटे यांनी सुरवातीपासूनच आपले आयुष्य हे समाजसेवेसाठी व्यतित केले. याचाच मागोवा या गुगल डुडलमधून घेण्यात आला आहे. कुष्ठरोगी लोकांसाठी केलेले काम, प्राण्यांप्रती असलेले त्यांचे प्रेम, साधी राहणी व महान समाजकार्य असे बाबांचे सर्व पैलू या गुगल डुडलमधून उलगडण्यात आले आहेत. 

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज 104वी जयंती! याच निमित्ताने गुगलने बाबा आमटे यांचा जीवनप्रवास दाखवणारे अप्रतिम असे डुडल तयार केले आहे. बाबा आमटे यांनी सुरवातीपासूनच आपले आयुष्य हे समाजसेवेसाठी व्यतित केले. याचाच मागोवा या गुगल डुडलमधून घेण्यात आला आहे. कुष्ठरोगी लोकांसाठी केलेले काम, प्राण्यांप्रती असलेले त्यांचे प्रेम, साधी राहणी व महान समाजकार्य असे बाबांचे सर्व पैलू या गुगल डुडलमधून उलगडण्यात आले आहेत. 

baba amte

बाबा आमटेंचे खरे नाव डॉ. मुरलीधर देवीदास आमटे. 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे त्यांचा जन्म झाला. बालपण अत्यंत सुखवास्तू घरात गेले असले, तरी मोठेपणी समाजाप्रती असलेल्या भानामुळे ते समाजकार्यात उतरले. कुष्ठरोगासारख्या असाध्य आजार असलेल्या लोकांना त्यांनी आधार दिला. चंद्रपुरात 'आनंदवन' उभारून कुष्ठरोग्यांची सेवा केली. 

baba amte

शिक्षण वकिलीत झाले असले, तरी त्यासोबत बाबांनी कुष्ठरोगावरील अभ्यासक्रम पूर्ण केला. काही काळ गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. तेव्हापासूनच बाबांची समाजकारायाला सुरवात झाली ती त्यांनी अखेरपर्यंत सुरू ठेवली. 9 फेब्रुवारी 2008 रोजी बाबांचे निधन झाले.

baba amte

बाबा आमटे यांनी वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बाचाओ आंदोलन अशा अनेक सामाजिक चळवळींचे नेतृत्व केले. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी म्हणजेच प्रकाश व विकास आमटे यांनी बाबांचा समाजकार्याचा प्रवास पुढे नेला. आता त्यांच्या सुना नातवंडेही समाजकार्यात अग्रेसर आहेत.  

baba amte


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google doodle on Social Worker Baba Amte s Birth Anniversary