तुम्ही वापरत असलेलं 'गुगल पे' भारतात अनधिकृत? Google Pay चा वापर करणं धोकादायक ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.  तुम्ही आम्ही, आपण सर्वच लॉकडाऊनमध्ये आणि खरंतर त्या आधीपासूनच पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी गुगल पे या UPI ऍप्लिकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर करतो

मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.  तुम्ही आम्ही, आपण सर्वच लॉकडाऊनमध्ये आणि खरंतर त्या आधीपासूनच पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी गुगल पे या UPI ऍप्लिकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. मात्र सध्याच्या काळात चिनी हॅकर्सकडून केले जाणारे सायबर हल्ले आणि त्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेली भीती मोठी आहे.

याच दरम्यान एक मेसेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. मेसेज आहे गुगल पे बद्दल. सोशल मीडियावर 'गुगल पे' याचा वापर तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो आणि तुमच्या बँक खात्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आता गुगल पे बंद करण्यात आलंय असं देखील या मेसेजेसमध्ये म्हटलंय. गुगल पे जर बंद करण्यात आलं असेल तर आपल्या बँकेच्या खात्यांसंदर्भात मोठा आणि गंभीर प्रश्न उभा राहू शकतो.

मोठी बातमी - पनवेलची हळद तब्बल ९० जणांना पडली भारी, नवरदेवाच्या भावाचा  कोरोनामुळे मृत्यू आणि...

यावर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ने ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीये. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गुगल पे भारतात बंद झालेलं नसल्याचं म्हटलंय. स्वतः गुगल पे च्या माध्यमातूनही एक महत्त्वाचं ट्विट करण्यात आलंय. यामध्ये गुगल पे हे भारतात कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करत नसल्याचं म्हटलंय. ग्राहक आणि पार्टनर बँकांमध्ये गुगल पे हे टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर म्हणून काम करत असल्याचं कंपनीने म्हटलंय.

व्हायरल मेसेजमध्ये गुगल पे हे ऍप भारतात अधिकृत नसल्यामुळे तुमचं ट्रान्झॅक्शन करताना काही अडचण आल्यास तुम्ही कादेशीर रित्या ती सोडवू शकत नाही असंही म्हंटल आहे. मात्र गुगल पे कडून करण्यात आलेल्या खुलाशात हे UPI ऍप्लिकेशन पूर्णपणे अधिकृत असल्याचं म्हटलंय. गुगल पे हे भारतातील इतर मान्यताप्राप्त UPI ऍप प्रमाणेच मान्यताप्राप्त ऍप असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

मोठी बातमी -  आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम; पावसासाठी आता पुढील महिन्याचीच प्रतिक्षा... 
 

google pay is not authorized in india reality check of viral message


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google pay is not authorized in india reality check of viral message