"मेंढपाळाच्या हस्तेचं करणार लोकार्पण"; पडळकर अहिल्यादेवींच्या स्मारकाकडं रवाना

सरकारला इतकी अॅलर्जी का? सदाभाऊ खोत
gopichand padlkar
gopichand padlkaresakal

शांततेच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत. स्मारकाचे लोकार्पण शांततेत करणार असून, मेंढपाळाच्या हस्तेच करणार आहोत.या सोहळ्याला बहुजन समाजाला विश्वासात घेतले नाही की साध पत्रिकेत नाव घातलं नाही. इतकी अॅलर्जी सरकारला आहे का असा प्रश्न रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी विचारला आहे.

अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या स्मारकाचे लोकार्पण आज मेंढपाळांच्या हस्ते करण्याचा निर्धार भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. त्यादृष्टीने आज पडळकर हजारो धनगर समाजातील कार्यकर्त्यांसह (sangli) स्मारकाकडे रवाना झाले आहेत.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.

gopichand padlkar
Raju Shetti l कोल्हापुरात राजू शेट्टी करणार महाविकास आघाडीची चिरफाड

या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी विश्रामगृह येथे धनगर समाजातील शेकडो कार्यकर्ते सूतगिरणी परिसरात जाण्यासाठी जमले. त्यापुर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोलवादान करत गजी नृत्य करुन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

gopichand padlkar
यशवंत जाधव प्रकरणी एकनाथ शिंदे म्हणाले, राजकीय सूडापोटी कारवाई नको

स्मारकाच्या ठिकाणी भूमिका ठरणार -पडळकर

यानंतर आमदार पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकभावना समजून घेऊन पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं. आम्ही शांततेत्या मार्गाने जाणार आहोत. आत्ता माझा (नृत्य) घाम निघाला आहे. आता तिकडच्या लोकांचा घाम काढण्यासाठी आम्ही निघलो आहोत. प्रशासनाने कार्यक्रमात गालबोट लावण्याचे काम करु नये. आम्ही चुकीचे काही करीत नाही. स्मारकाच्या ठिकाणी आमची भूमिका ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून महापालिकेतील राष्ट्रवादी - कॉग्रेस विरुद्ध भाजप उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज कडेकोट बंद पुकारण्यात आला आहे.स्मारकाच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी अडथळे उभारून रोकले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com