अहिल्यादेवींच्या स्मारकाचं ड्रोनद्वारे उद्घाटन केल्याचा पडळकरांचा दावा

Gopichand Padalkar
Gopichand PadalkarEsakal

सांगली : सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद आता पुन्हा एकदा पेटला आहे. शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. मात्र, ते करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत हेदेखील त्यांच्यासोबत या उद्घाटनाला विरोध करत आहेत. ज्या शरद पवरांनी गोरगरिबांची फसवणूक केली आहे, त्या पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होऊ नये, अशी आक्रमक भूमिका पडळकरांनी घेतली आहे. त्यामुळे, अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या स्मारकाचे लोकार्पण आज मेंढपाळांच्या हस्ते करण्याचा निर्धार भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला होता. त्यानुसार, त्यांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला असल्याचं जाहीर केलंय. दरम्यान, त्या ठिकाणी दोन एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Gopichand Padalkar
मल्टीप्लेक्स उद्योगात मोठी घडामोड; PVR आणि INOX यांचं होणार विलिनीकरण

माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी जाहीर केलंय की, मेंढपाळांच्या हस्ते ड्रोनमधून गुलाबाची फुले अहिल्यादेवींच्या स्मारकावरती लावून हा लोकार्पणाचा सोहळा पार पडला आहे. आमचा हेतू स्वच्छ होता आणि तो पूर्ण झाला आहे. आम्ही मेंढपाळांच्या हस्ते डिजिटल इंडियामध्ये ड्रोनचा वापर करुन आम्ही त्या स्मारकावरती फुले टाकली आणि उद्घाटन केलं. तसेच आधुनिक पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पाडला असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकार जरी चुकीचं वागलं तरी आम्ही चुकीचं वागणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, कार्यकर्त्यांना जोवर सोडलं जात नाही, तोवर आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका गोपिचंद पडळकर यांनी घेतली आहे.

Gopichand Padalkar
जाधवांच्या डायरीतील 'मातोश्री' उल्लेखाबाबत फडणवीस म्हणाले...

आज पडळकर आपल्या हजारो धनगर समाजातील कार्यकर्त्यांसह (sangli) स्मारकाकडे रवाना झाले होते. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साऱ्या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी विश्रामगृह येथे धनगर समाजातील शेकडो कार्यकर्ते सूतगिरणी परिसरात जाण्यासाठी जमले होते. त्यापुर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोलवादान करत गजी नृत्य करुन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com