'महाविकासकडून कोणतीही कारवाई नाही; नाना पटोलेंना अटक करावी'

नारायण राणे यांना वेगळा आणि नाना पटोले यांना वेगळा कायदा असं का?
'महाविकासकडून कोणतीही कारवाई नाही; नाना पटोलेंना अटक करावी'

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी 'मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाचे नेते आणि (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांकडून नाना पटोले यांच्यावर टीका सुरु आहे. दरम्यान आता भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी महाविकासआघाडीकडून नाना पटोले यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही, त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.

आमदार पडळकर म्हणाले, नारायण राणे यांना वेगळा आणि नाना पटोले यांना वेगळा कायदा असं का? आज आम्ही सरकारविषयी काही बोललो तर खोटे गुन्हे दाखल होतात. यासंदर्भात माझ्या भावाला हद्दपार होण्याची नोटीस आली आहे. जर आता आघाडी सरकारमधून नाना यांच्यावर कोणती कारवाई होणार नसेल तर त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुढे वट्टेडिवार यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, तुम्ही तात्काळ धरून उत्तर देत नाही. तुम्ही फक्त बडबड करत राहता. त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं आहे. यांचे आधी होती दासी तीस केले पट्टराणी असं झालं आहे. माझी पातळी ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिले. जनता बघून घेईल, असंही ते म्हणाले.

याप्रकरणी पोलिसांनी नाना प्रकरणी तपास करावा. काँग्रेस किती खाली घसरली आहे हे पहावे. राज्य पोलिसांनी तपास करावा. देशांचा पंतप्रधानांविषयी बोलणार आणि आक्रमक होण्याचा आम्हाला हक्क आहे. पंतप्रधानांबाबत बोलणाऱ्यावर बोलणे आमची जबाबदारी आहे. पण काँग्रेसचे जबाबदारी त्यांना कळली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com