esakal | वडेट्टीवारांचं मानसिक संतुलन बिघडलंय, पडळकरांचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

padalkar wadettiwar

वडेट्टीवारांचं मानसिक संतुलन बिघडलंय, पडळकरांचा पलटवार

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (minister vijay wadettiwar) यांची छत्तीसगडमध्ये फॅक्टरी असल्याचा आरोप भाजप नेते गोपिचंद पडळकर (BJP leader gopichand padalkar) यांनी केला होता. त्यानंतर वडेट्टीवार चांगलेच संतापले असून त्यांनी 'एका बापाची औलाद असेल तर सिद्ध करून दाखव. नाहीतर मी ५० कोटींचा दावा ठोकणार' असा पडळकरांना दिला होता. त्यावर आता गोपिचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा: पाचशे किलोच्या नंदीने चिमुकल्यांना लावलेय वेड, बनवायला लागले सहा महिने

''विजय वडेट्टीवार यांचा कतृत्व अहवाल जनतेच्या नजरेस पडला. त्यामुळे त्यांच मानसिक संतुलन बिघडणे हे स्वाभाविक होते. मांजर डोळे झाकून दूध पितं. तरीही ते लोकांना दिसत असतं. महाराष्ट्रातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्या हक्काचे १२५ कोटी रुपये यांच्या ६०-४० च्या टक्केवारीमध्ये खर्च करता आले नाही आणि हे माझ्यावर ५० कोटींचा दावा दाखल करायला निघाले आहेत. पण, खुशाल दाखल करा. मी असल्या गोष्टींना घाबरत नाही.'', असे पडळकर म्हणाले.

काय म्हणाले होते वडेट्टीवार? -

वडेट्टीवार यांनी दारुची दुकाने लाटली आहेत. त्यासाठीच चंद्रपूरमधील दारुबंदी हटविल्याचा खळबळजनक आरोप आमदार पडाळकरांनी केला होता. त्यावर वडेट्टीवार चांगलेच भडकले. खऱ्या बापाची औलाद असेल तर पडाळकरांनी आरोप सिद्ध करावे असे खुले आव्हान त्यांना वडेट्टीवार यांनी दिले. आपल्या व नातेवाइकांच्या नावाने राज्यात एकही दारुचे दुकान नाही. छत्तीसगडमध्ये कुठलीही कंपनी नाही. त्यामुळे पडाळकर आणि वडेट्टीवार वाद चांगलाच रंगणार असल्याचे दिसून येते. आमदार पडळकर ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचे काम करीत आहे. कोणाची तरी सुपारी घेऊन ते बोलत आहे. ओबीसींचा एवढाच पुळका असेल तर पडाळकरांनी सोबत यावे. कुलदैवताची शपथ घेऊन भाजपमध्ये जाणार नाही, असे पडळकर भर सभेत बोलले होते. त्याचे काय झाले असा सवाल उपस्थित करून वडेट्टीवार यांनी पडळकरांना कोणावरही बेछूट आरोप करून स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायची सवय लागली आहे. ते पराभूत उमेदवार आहेत. भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठविले आहे. भाजपच्या नेत्यांना खूष करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करायचे एवढेच काम ते करीत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

loading image
go to top