Gopinath Munde Punyatithi : UP च्या आधी गोपिनाथ मुंडेंनी मुंबईत घातला होता एन्काऊंटरचा पाया, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदही घाबरलेला l Gopinath Munde Punyatithi Maharashtra Encounter Specialist | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopinath Munde Punyatithi

UP च्या आधी गोपिनाथ मुंडेंनी मुंबईत घातला होता एन्काऊंटरचा पाया, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदही घाबरलेला!

Maharashtra Encounter Specialist : उत्तर प्रदेशमध्ये माफीया राज संपवण्यासाठी एनकाउंटरची रणनीती स्वीकारली आहे. काही दशकांपूर्वी मुंबईनेपण अशीच नीती स्वीकारली होती. ज्यामुळे मुंबई अंडरवर्ल्ड कारवाया गार पडल्या. या रणनीतीने जसे फायदे झाले तसे काही तोटेही.

नव्वदच्या दशकात मुंबईवर माफीया राज होता. दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरूण गवळी, अश्विन नाईक आणि अबू सलेम सारखे डॉन आपल्या दहशतीने मुंबईत आपला काळे धंदे चालवत होते. या टोळ्यांमध्ये गँगवॉर तर होतच होते पण ते जबरदस्ती खंडणीपण वसूल करायचे. बिल्डर, व्यावसायिक, बार मालक, फिल्म इंडस्ट्रीमध्ये खंडणीसाठी फोन जायचे. जे पैसे देत नव्हते त्यांना गोळी घालून मारुन टाकले जात होते.

पोलिस गुन्हेगारांना पकडत पण...

गँस्टर्सची हिंम्मत एवढी वाढलेली होती की, त्यांनी पोलिस कमिश्नरच्या ऑफीस समोरच्या कपडा मालकाला गोळ्या घालून मारलं. गुन्हेगारांना पकडलं तरी ते साक्षीदारांना धमकावून, पुरावे मिटवून कोर्टातून सुटका करून घेत होते.

गोपिनाथ मुंडेंनी पोलिसांना दिली होती मोकळीक

महाराष्ट्रात १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचं युती सरकार आलं अन् उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपिनाथ मुंडेंनी पोलिसांना मोकळीक दिली. अंडरवर्ल्डवर आळा घालण्यासाठी त्यांनी पोलिसांना पुर्ण सूट दिली होती. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, गँगस्टर संपवण्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा पण मुंबई स्वच्छ करा. यानंतर अनकाउंटरचा सिलसिला सुरू झाला. दर एकदिवसा आड पोलिस एखाद्या टोळीच्या गँस्टरला कथित एनकाउंटरमध्ये मारत होते.

बंदुकीचं उत्तर बंदुकीनं या पोलिसांच्या रणनीतीने परिणाम दिसायला लागले होते. त्यामुळे या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत साधारण सर्वच गँग थंड पडल्या होत्या. बहुतांश गँगस्टर एकतर मारले गेले नाहीतर जेलमध्ये गेले. आता मुंबईमध्ये ९० च्या दशकाप्रमाणे रोज न गँगस्टर शुटआउट करतात ना पोलीस.

पण या रणनीतीमुळे मुंबई पोलिसांमध्ये एका वेगळ्याच प्रकारचे पोलिस निर्माण करायला सुरुवात केली. मीडिया अशा पोलिसांना एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणायला लागली. कारण याच काही पोलिसांनी गँगस्टर्सला मारलं होतं. त्यांना मीडियाने हिरो बनवलं. ते राजकीय नेत्यांचेही खास होते. या एनकाउंटर स्पेशालिस्ट पोलिसांनी गुन्हेगारांतर संपवलं पण पुढे जाऊन स्वतःच एक एक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये अडकत गेले.

टॅग्स :policeMumbaiMumbai Crime