गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत संशय होताच, चौकशी करा: मुंडे

Dhananjay Munde
Dhananjay Munde

औरंगाबाद : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला, त्या दिवसापासून अपघात की घात, असा संशय होता, आजही तो कायम आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) "हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक "ईव्हीएम'मध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना या गैरव्यवहाराची कल्पना होती, म्हणून त्यांची हत्या झाली,'' असा खबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने केला आहे. या दाव्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना संशय व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, की सय्यद शुजा याने केलेला खुलासा ऐकून या संशयाला पुष्टी मिळते. मृत्यू प्रकरणाची 'रॉ' किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com