आमदारांचा उद्याच शपथविधी; राज्यपालांनी बोलविले अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

आमदाराचा उद्याच शपथविधी होणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात एकावर राजकीय भूकंप होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर कालीदास कोळंबकर यांनी हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली असून त्यांना राज्यपालांनी शपथ दिली. त्यांनंतर आमदाराचा उद्याच शपथविधी होणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अधिवेशन बोलविले असून विधानसभेचं अधिवेशन उद्या (ता.27) सकाळी आठ वाजता होणार आहे. भगतसिंह कोश्यारी एका आदेशाद्वारे सांगितले आहे की, अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन विधानसभेची बैठक बोलविण्यात येत आहे.

कालीदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी

No photo description available.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणात एकावर राजकीय भूकंप होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. सर्वात कमी वेळात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली. यानंतर मात्र, आता महाविकासआघाडी उद्या राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governer called Maharashtra assembly session on tomorrow