‘प्रियांका गांधींना सरकार घाबरते’ - बाळासाहेब थोरात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 जुलै 2019

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी आज येथे जोरदार निदर्शने केली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.

मुंबई - भाजपचे सरकार काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना घाबरते, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सरकारला टोमणा लगावला.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी आज येथे जोरदार निदर्शने केली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे काही दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून दहा लोकांची हत्या झाली. प्रियांका गांधी यांनी आज सोनभद्रला भेट देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांकांच्या वाहनांचा ताफा अडवून त्यांना ताब्यात घेतले. हे वृत्त समजताच काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना केलेली अटक बेकायदा आहे.

हिंसाचारात बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना भेटायला जाणे हा गुन्हा आहे काय? असा सवाल करत थोरात यांनी पोलिसांनी आमच्या नेत्यांना अटक करण्याऐवजी गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government is afraid of Priyanka Gandhi balasaheb thorat politics