मोठी बातमी - राज्यात ८ जुलैपासून हॉटेल्स आणि लॉज होणार सुरु, सरकारने दिली सशर्त परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

राज्यातील हॉटेल व्यवसायाबाबत मोठी बातमी समोर येतेय. महाराष्ट्रातील लॉज आणि हॉट्स सुरु करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

मुंबई : राज्यातील हॉटेल व्यवसायाबाबत मोठी बातमी समोर येतेय. महाराष्ट्रातील लॉज आणि हॉटेल्स सुरु करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. राज्यात येत्या बुधवारपासून म्हणजेच ८ जुलैपासून हॉटेल्स आणि लॉज सुरु होणार आहेत.

दरम्यान मुंबई, मुंबई MMR, पुणे, नागपूर, औरंगाबादमधील कंटेनमेंट झोन वगळता लॉज आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या परवानगीत आता गेस्ट रूम, लॉज आणि हॉटेल मालकांना ३३% क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान हॉटेल आणि लॉज जरी सुरु होणार असलेत तरीही राज्यातील रेस्टॉरंट अद्याप सुरु होणार नाहीयेत. 

BIG NEWS - मुंबईकरांनो काळजी करू नका, 'या' अत्यंत प्रभावी औषधाची तब्बल ३५०० इंजेक्शन हैदराबादहून आलीत...

BIG NEWS -  मुंबई आता 'युनिव्हर्सल टेस्टिंग पॉलिसी'; कमी वेळात होणार कोरोनाच्या अधिक चाचण्या.. 

काय आहेत नियम 

  • हॉटेल किंवा लॉज मालक आपल्या हॉटेल किंवा लॉज मध्ये ३३ टक्के बुकिंग घेऊ शकतात. 
  • हॉटेलमध्ये येणाऱ्यांचा सर्वात आधी टेम्परेचर स्क्रिनिंग करावं लागणार आहे 
  • हॉटेलमध्ये थांबणाऱ्या व्यक्तींच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप्लिकेशन असणं बंधनकारक आहे. 
  • मास्क घालणे, फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळणं अनिवार्य असणार आहे
  • हॉटेलचं बिल भरण्यासाठी डिजिटल पेमेंट करावं लागेल 
  • हॉटेलमधील AC चं तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सियस असावं 
  • हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांनी फेस मास्क, ग्लोव्ज , सॅनिटायझर यांचा वापर कारण बंधनकारक असणार आहे  
  • हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये केवळ हॉटेलमध्ये थांबलेल्या ग्राहकांनाच जात येईल. बाहेरील कुणालाही हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाही 

दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आहार संघटनेने स्वागत केलंय. गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असलेल्या व्यवसायाला आता चालना मिळेल असं आहाराच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 

government gives permission to start hotels lodges and guest rooms of maharashtra 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government gives permission to start hotels lodges and guest rooms of maharashtra