वीजग्राहकांच्या तक्रारींबाबत सरकार आयोगाकडे जाणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई - मुंबई उपनगरातील वीजग्राहकांवर अदानी कंपनीने लादलेले वाढीव दर आणि मीटरचे रीडिंग न घेताच दिलेली देयके याबाबतच्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सरकार तातडीने वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) जाणार आहे, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुंबई उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी कंपनीने देयकांच्या रकमेत 50 ते 100 टक्‍के वाढ केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. कंपनीने वीजदरांत वाढ केली असून, मीटरचे रीडिंग न घेताच सरासरी देयके दिली आहेत, अशा तक्रारी ग्राहक करीत आहेत. या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्र्यांना दिले होते. सरकारने वीजग्राहकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सरकार एमईआरसीकडे जाणार असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Government go to the commission regarding electricity consumers complaint