लहान उद्योगांकडे सरकारचे दुर्लक्ष - रघुनाथ माशेलकर

Dr.-Raghunath-Mashelkar
Dr.-Raghunath-Mashelkar

मुंबई - ‘अनुदान आणि सोई-सुविधा मिळत नसल्याने लघुउद्योगांची प्रगती खुंटली आहे. सरकारकडून मोठ्या उद्योगांना सढळ हस्ते मदत, तर लघुउद्योगांकडे दुर्लक्ष होते, ही बाब गंभीर आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ व ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र इकॉनॉमिक समिट व महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशनच्या प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. नांदेडच्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट  सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांना ‘वूमन एंटरप्रेन्युअर ऑफ दि इयर’ हा पुरस्कार  देण्यात आला. 

सरकार लघुउद्योगांसाठी यशस्वीपणे प्रयत्न करताना दिसत नाही; तसेच औद्योगिक संस्थेकडे सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा, तो दिसत नसल्याची खंत डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे आदी उपस्थित होते.

महिलांनी उद्योगाची कास धरावी
गाव पातळीवर महिला सक्षम झाली पाहिजे, महिलांना पाठबळ मिळावे, चूल आणि मूल यामध्येच न राहता महिलांनी उद्योगाची कास धरली पाहिजे, उद्योगांच्या वेगवेगळ्या छटा समजून घेतल्या पाहिजेत, असे आवाहन राजश्री पाटील यांनी या वेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com