जिल्हानिहाय कर्जमाफीची आकडेवारी सरकारकडे नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने 14,388 कोटी कर्जाचे वाटप 46.52 लाख शेतकऱ्यांना केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना सरकारने दिली असली तरीही जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याची कबूली दिली.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने 14,388 कोटी कर्जाचे वाटप 46.52 लाख शेतकऱ्यांना केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना सरकारने दिली असली तरीही जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याची कबूली दिली.

अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती मागताना एकूण शेतकऱ्यांची संख्या, एकूण मंजूर आणि नामंजूर अर्जाची संख्या, बँकेचे नाव, एकूण वाटप निधी याची माहिती जिल्हानिहाय मागितली होती. यावर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी अनिल गलगली यांना कळविले, की एकूण बँकेत जमा केलेल्या निधीची रक्कम याबाबत जिल्हा निहाय माहिती शासन स्तरावर उपलब्ध नाही. तसेच विदर्भातील गावनिहाय माहितीसुध्दा शासन स्तरावर उपलब्ध नाही. यामुळे एकूण कर्जवाटप  प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे गलगली यांनी म्हटले आहे.

अनिल गलगली यांना उपलब्ध करुन दिलेल्या माहितीनुसार 36 जिल्हे आणि इतर असे एकूण 37 जिल्ह्यात 56 लाख 59 हजार 159 अर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत आले असून सर्वाधिक अर्ज अहमदनगर जिल्ह्यातील आहेत ज्याची संख्या 3 लाख 34 हजार 920 इतकी आहे.

14 हजार 797 अर्ज इतर जिल्ह्यात दाखविण्यात आले आहेत तर 1620 मुंबई उपनगर आणि 23 हजार 715 मुंबई शहरातील अर्ज आहेत. राष्ट्रीयकृत बँकेतील 19 लाख 88 हजार 234 खाते मंजूर झाले असून 77 अब्ज  66 कोटी 55 लाख 13 हजार 440. 76 इतकी रक्कम बँकेला दिली असून बँकेने 75 अब्ज 89 कोटी 98 लाख 20 हजार 857. 28 इतकी रक्कम लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे.

डीसीसी बँकेतील 26 लाख 64 हजार 576 खाते मंजूर झाले असून 67 अब्ज 70 कोटी 18 लाख 88 हजार 772. 36 इतकी रक्कम बँकांना दिली. जिल्हा बँकांनी 67अब्ज 97कोटी 74 लाख 78 हजार 292. 76 इतकी रक्कम लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे. 33 राष्ट्रीयकृत आणि 30 डीसीसी बँकेत 46 लाख 52 हजार 810 खाती मंजूर आहेत.  145 अब्ज 36 कोटी 74 लाख 02 हजार 213. 11 इतकी रक्कम बँकेस दिली असून बँकेने 143 अब्ज 87कोटी 72 लाख 99 हजार150. 04 इतकी रक्कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे.

Web Title: Government of Maharashtra does not have districtwise distribution of loan waiver