पिकांच्या नुकसानाबाबत सरकार गंभीर नाही - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

राज्यात परतीच्या पावसामुळे शंभर लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने ७० लाख हेक्‍टरवर नुकसान झाल्याचे म्हटले आहे. सरकारची ही आकडेवारी योग्य वाटत नाही. पिकांच्या नुकसानाकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

तुळजापूर - राज्यात परतीच्या पावसामुळे शंभर लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने ७० लाख हेक्‍टरवर नुकसान झाल्याचे म्हटले आहे. सरकारची ही आकडेवारी योग्य वाटत नाही. पिकांच्या नुकसानाकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला. 

शेट्टी म्हणाले, की परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्व विभागांतील शेतकरी कोलमडला आहे. कोकणातील भात शेती गेली. आंब्याचा हंगाम दोन महिने पुढे गेला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, मका आदी पिके वाया गेली. रब्बी पेरणीचा हंगाम पुढे गेला. पेरणी करता येत नसल्याने रब्बीबाबतही भवितव्यही अंधारात आहे. याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. मोठे नुकसान झालेले असताना पंचनाम्याची गरज काय? शेतकऱ्याना मदत मिळायला हवी. शेतकऱ्यांनी विमा उतरविताना सर्व कागदपत्रे कंपन्यांना दिली आहेत. , असे शेट्टी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government is not serious about crop loss raju shetty