सरकारच्या हातावर अधिकाऱ्यांची 'तुरी'

महेंद्र महाजन
गुरुवार, 27 एप्रिल 2017

आकडे बोलतात

विभाग दुसरा नजर अंदाज तिसरा नजर अंदाज
नाशिक 491 915
पुणे 685 631
कोल्हापूर 357 631
औरंगाबाद 823 1091
लातूर 791 1747
नागपूर 669 1685
अमरावती 886 1234

(उत्पादन हेक्‍टरी किलोग्रॅममध्ये)

नाशिक - राज्याचे तुरीचे सरासरी दुसऱ्या नजर अंदाजानुसार 661.42 हेक्‍टरी किलोग्रॅम उत्पादन वर्तवण्यात आले होते. तिसऱ्या नजर अंदाजानुसार हेच उत्पादन 1133.42 हेक्‍टरी किलोग्रॅम इतके पुढे आले आहे. कृषी सचिवालयाने सोशल मीडियातून विभागनिहाय आकडेवारीकडे लक्ष वेधत याहून चांगली पडताळणी आपण करु शकत नाही काय? असा प्रश्‍न उपस्थित करत यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनाबद्दल कागदीघोडे नाचवणारे कृषीचे अधिकारी अडचणीत आले आहेत. 

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या तुरीच्या उत्पादनाच्या अंदाजामध्ये कृषीची यंत्रणा कुचकामी ठरली आहे. 'सकाळ'ने आज कृषी यंत्रणेकडूनच सरकारच्या 'हातावर तुरी' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर सोशल मीडियातून कृषी सचिवालयाने विभागनिहाय अंदाजाचे वाभाडे काढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (ता. 28) सकाळी मुंबईत राज्याच्या खरीप हंगामाची आढावा बैठक होत आहे. त्याअगोदर कृषी सचिवालयाने घेतलेली भूमिका बोलकी असून कृषीच्या कार्यालयात बसून कागदीघोडे नाचवण्याच्या कृतीत बदल करण्याचा नेमका कोणता धोरणात्मक निर्णय घेतला जाणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शेतीमालाच्या भावाचे प्रश्‍न तयार झाल्यावर शेतकऱ्यांच्या रोषापुढे सरकारला झुकावे लागते अन्‌ मग प्रत्यक्ष उत्पादनाच्या नाचवल्या जाणाऱ्या कागदीघोड्यांचे विदारक चित्र पाहिले जाते. ही बाब तशी आता नवी उरलेली नाही. ऊसाच्या उत्पादनापासून सुरु झालेली ही परिस्थिती पुढे कांद्याच्या निमित्ताने ऐरणीवर आली होती. तुरीने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यातून धडा घेत प्रत्यक्ष शेतातील उत्पादनाकडे यंत्रणेला लक्ष घालण्यास सरकार नेमके कधी भाग पाडणार? हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो आहे. शेती क्षेत्रातील अभ्यासकांना न उलगडणाऱ्या कोड्यासह राज्य सरकारला देण्यात येणाऱ्या आकडेवारीशी केंद्राची आकडेवारी जुळत नाही असेही अनुभवायला मिळाले आहे.

आकडे बोलतात

विभाग दुसरा नजर अंदाज तिसरा नजर अंदाज
नाशिक 491 915
पुणे 685 631
कोल्हापूर 357 631
औरंगाबाद 823 1091
लातूर 791 1747
नागपूर 669 1685
अमरावती 886 1234

(उत्पादन हेक्‍टरी किलोग्रॅममध्ये)

Web Title: government officers cheat for government on Tur purchase