राज्यातील 89 पोलिस अधिकाऱ्यांची बदली 

police
police

पुणे : राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी पोलिस दलातील तब्बल 52 वरिष्ठ अधिकारी आणि 37 अन्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढला. यामध्ये काही अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह बदली करण्यात आली.

दरम्यान, नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे यांची पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली; तर सध्याचे "एसीबी'चे अधीक्षक संदीप दिवाण यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. 

पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात बदली झालेले अधिकारी : 
राकेश कलासागर (अधीक्षक, अकोला ते अधीक्षक तांत्रिक सेवा, सीआयडी, पुणे), नीवा जैन (अधीक्षक, सीआयडी, अमरावती ते समादेशक, एसआरपीएफ 1, पुणे), संदीप अटोळे (अप्पर अधीक्षक , गोंदिया ते प्राचार्य, नानविज दौंड), रोहिदास पवार (अप्पर अधीक्षक, अहमदनगर ते प्राचार्य, नानविज दौंड), नीलेश अष्टेकर (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानविज, दौंड ते अधीक्षक सीआयडी, पुणे), कविता नेरकर-पवार (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर, ते अप्पर अधीक्षक, लोहमार्ग, पुणे), पौर्णिमा गायकवाड (समादेशक, एसआरपीएफ, नवी मुंबई ते पोलिस उपायुक्त, झोन तीन, पुणे शहर), स्मिता पाटील (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते उपायुक्त झोन 1, पिंपरी चिंचवड), सुधीर हिरेमठ (सहायक पोलिस महानिरीक्षक, राज्य पोलिस मुख्यालय, मुंबई ते झोन 2, पिंपरी-चिंचवड), शशिकांत बोराटे (अपर अधीक्षक, सांगली ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)- पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातून अन्यत्र

बदली झालेले अधिकारी : 
अरविंद चावरिया (समादेशक, एसआरपीएफ 1 ते अधीक्षक एसीबी, औरंगाबाद) मंगेश शिंदे (उपायुक्त झोन 3, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक गोंदिया), मनीषा बी. डुबुले (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानविज दौंड ते अप्पर अधीक्षक सांगली), ज्योती क्षीरसागर (पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, तासगाव, जि. सांगली), तुषार पाटील (अप्पर अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ते अप्पर अधीक्षक, सिंधुदुर्ग), कल्पना बारावकर (सीआयडी, पुणे ते अधीक्षक, प्रशासन एसपीयू, मुंबई), नम्रता पाटील (उपायुक्त, पिंपरी-चिंचवड ते राज्य गुप्तवार्ता विभाग, सागरी परिक्षेत्र, मुंबई), स्मार्तना पाटील (उपायुक्त, पिंपरी-चिंचवड ते उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे), नीलेश मोरे (एसीपी, पुणे शहर ते अप्पर अधीक्षक, वर्धा-पदोन्नतीने). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com