सरकारी प्रकाशकांना मिळेनात वितरक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्य सरकारने प्रकाशित केलेले ग्रंथ वितरित करण्यात तीन वितरकांनीच रस दाखवला आहे. 

राज्य सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेने 50 वितरकांना पत्रे पाठवली होती. त्यापैकी तीन जणांनीच प्रतिसाद दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही पुस्तके वाचकांपर्यंत पोचवायची कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

राज्य मराठी विकास संस्थेपासून ते साहित्य संस्कृती मंडळापर्यंत अनेक संस्था ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, कोश आदी साहित्य प्रकाशित करतात. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आपली स्वतंत्र वितरण व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद मात्र निराशाजनक आहे. 

सरकारकडे ग्रंथ वितरणासाठी सक्षम यंत्रणा नसल्यामुळे प्रदर्शनांमधील सरकारी स्टॉलवर पुस्तकप्रेमी गर्दी करतात. काही ग्रंथांची हातोहात विक्री होते. सरकारी प्रकाशनांची विक्री वर्षभर करता यावी, यासाठी वितरण व्यवस्था सक्षम करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. 

इतर प्रकाशक पुस्तकांवर 40 टक्के सवलत देतात, आम्ही 50 टक्के देण्याची तयारी दाखवली तरीही प्रतिसाद मिळाला नाही, याचे आश्‍चर्य वाटते, अशी व्यथा राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक आनंद काटीकर यांनी व्यक्त केली. 

Web Title: Government publishers distributors not found