सरकारला लिंगायत धर्माला मान्यता द्यावीच लागेल डॉ. शिवलिंग शिवाचार्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत लिंगायत मोठ्या प्रमाणात आहेत. लिंगायत धर्माला मान्यता देण्यासाठी सुरू केलेला लढा आता या सर्व राज्यात पोहोचत आहे. सरकार कोणाचेही असो आम्हाला देणे-घेणे नाही, सरकार टिकून राहण्यासाठी लिंगायत धर्माला मान्यता व अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावाच लागेल, असा इशारा अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे प्रमुख डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिला. 

सोलापूर : कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत लिंगायत मोठ्या प्रमाणात आहेत. लिंगायत धर्माला मान्यता देण्यासाठी सुरू केलेला लढा आता या सर्व राज्यात पोहोचत आहे. सरकार कोणाचेही असो आम्हाला देणे-घेणे नाही, सरकार टिकून राहण्यासाठी लिंगायत धर्माला मान्यता व अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावाच लागेल, असा इशारा अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे प्रमुख डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिला. 

लिंगायत समन्वय समितीच्या वतीने आज महात्मा बसवेश्‍वर पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या समारोप सभेत ते बोलत होते. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी, लिंगायत धर्माला राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा, 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत लिंगायत धर्मासाठी स्वतंत्र कॉलम द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. डॉ. शिवलिंग शिवाचार्य म्हणाले, तुम्हा सर्वांना लिंगायत धर्म मान्य आहे, तर या मागणीसाठी तुम्ही संघटित व्हा. लिंगायत धर्म मान्यतेसाठी देशातील समाज एकवटल्यास कोणतेही सरकार असो घरी येईल या धर्माची मान्यता देईल. अहंकार कमी करा, आपसांतील मतभेद कमी करा आणि लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी एकत्रित येण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

Web Title: Government should give approval to Lingayat Dharma: Dr. Shivling Shiva