हे सरकार म्हणजे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' ; विरोधकांची पोस्टरबाजी

हे सरकार म्हणजे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' ; विरोधकांची पोस्टरबाजी

मुंबई : उद्यापासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. मात्र, विरोधीपक्षांच्या पत्रकार परिषदेवेळी लावण्यात आलेल्या 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' हे पोस्टरच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो झळकत आहेत.

उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठक झाली.  त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि अभिताभ बच्चन आणि अमिर खान यांनी भूमिका केलेल्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचे पोस्टर, परंतु या पोस्टरवर 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' असे दर्शविण्यात येऊन, आमीर खानच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचे चेहरे दाखवले आहेत. ठगबाजीची चार वर्षे असे नाव पोस्टरला देण्यात येऊन, गेल्या चार वर्षात विविध विभागात कशी पिछेहाट झाली आहे. ते नमूद केले आहे.

पोस्टरवर जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी वगैरे नावे दिली आहेत. या पोस्टरद्वारे सरकारवर जहरी टीका केली असून हे पोस्टर चर्चेचा विषय झाले आहे. यावरून उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक असणार, हे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com