दिव्यांग स्वावलंबनासाठी सरकारची नवी योजना

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई - दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेइकल) मोफत उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

दिव्यांगांना फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद उपलब्ध आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देण्यासह त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अशा योजनांमधून दिव्यांग व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्याच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे शक्‍य होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना फिरत्या वाहनाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ किंवा किरकोळ किराणा विक्री यांसारखे व्यवसाय करता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

Web Title: government's new plan for the independence of Divyang