राज्यपालांचे अभिभाषण संघाचा अजेंडा राबवणारे?: मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरू झाले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हिंदू महासभेच्या काही लोकांनी गोळ्या घालण्याचा प्रकार केला होता. गांधींच्या विचारांना देशातून नामशेष करू पाहणाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

मुंबई : राज्यपाल हे पद घटनात्मक असताना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल, की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे? याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत आहोत, अशी भूमिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरू झाले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हिंदू महासभेच्या काही लोकांनी गोळ्या घालण्याचा प्रकार केला होता. गांधींच्या विचारांना देशातून नामशेष करू पाहणाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
 
विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. गांधी जयंतीच्या दिवशी हिंदू महासभेने केलेल्या कृत्याविरुद्धचा निषेध नोंदवण्यासाठी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या सदस्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन केले. दंडाला काळ्या फिती लावून हे मूक आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तेव्हा राज्यपालांनी संघाचे समर्थन केले होते. म्हणून विरोधीपक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: governors address is being implemented by the Agenda of RSS says Dhananjay Munde