नाना म्हणे, 'मला काहीच माहित नाही!'; असं कसं होईल? | Nana Patole Reaction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

Nana Patole : नाना म्हणे, 'मला काहीच माहित नाही!'; असं कसं होईल?

Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये काय चाललं आहे यावरुन आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात सर्वाधिक चर्चा ही नाशिक पदवीधर मतदार संघाची आहे. त्यात कॉग्रेसचं राजकारण काही केल्या कळायला मार्ग नसल्याचे दिसत आहे.

यासगळ्यात राज्याचे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली प्रतिक्रियेची चर्चा होत आहे. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहे. नाना पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये एकाच वाक्याची पुनरावृत्ती करत होते. ते म्हणजे मला अजुनही काहीही माहिती नाही. ती घेतो मग तुमच्याशी बोलतो.

Also Read - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा आमच्यामध्ये झालेली नाही. मलाही मीडियाकडूनच बऱ्याचशा गोष्टी कळाल्या आहेत. त्यामुळे मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काहीही बोलणार नाही. असे पटोले यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी हरएक प्रकारे त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला मात्र नाना त्यांच्या वक्तव्यावर ठाम होते.

हेही वाचा: Satyajeet Tambe : राहुल गांधीचा कट्टर शिलेदार ते देवेंद्र फडणवीसांशी छुपी मैत्री, कसा आहे सत्यजीत तांबेंचा प्रवास...

राज्याच्या राजकारणात सध्या वेगळचं वारं वाहताना दिसत आहे. निमित्त आहे पदवीधर मतदार संघ आणि त्याच्या निवडणूकीचे. मविआकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसकडून डॉ.सुधीर तांबे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली मात्र, ऐनवेळी सुधीर तांबेंनी आपली उमेदवारी मागे घेतली.

हेही वाचा: Satyajeet Tambe : ट्विस्ट निर्माण करणे 'सत्यजीत'

तांबे यांच्या माघारीनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला.दरम्यान आता ही निवडणूक बिनविरोध होणार का याबद्दल चर्चा सुरू आहे. यासगळ्यात कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि कॉग्रेस पक्ष यांना तांबे पीता-पुत्रांकडून अंधारात ठेवलं असल्याचे बोलले जात आहे.