'ऍमेझॉन'चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

मुंबई - ब्रॅंडेड वस्तूंवर सर्वाधिक सवलती देणारा ऍमेझॉन इंडियाचा सहा दिवसांचा "ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल घटस्थापनेपासून (बुधवार, ता. 10) सहा दिवसांचा आयोजित केला आहे. ऍमेझॉन प्राइम सदस्यांसाठी "प्राइम अर्ली ऍक्‍सेस' योजनेत हा सेल एक दिवस आधीच म्हणजे नऊ ऑक्‍टोबर (मंगळवारी) रोजी दुपारी 12 पासून सुरू होणार असल्याचे ऍमेझॉनने म्हटले आहे.

मुंबई - ब्रॅंडेड वस्तूंवर सर्वाधिक सवलती देणारा ऍमेझॉन इंडियाचा सहा दिवसांचा "ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल घटस्थापनेपासून (बुधवार, ता. 10) सहा दिवसांचा आयोजित केला आहे. ऍमेझॉन प्राइम सदस्यांसाठी "प्राइम अर्ली ऍक्‍सेस' योजनेत हा सेल एक दिवस आधीच म्हणजे नऊ ऑक्‍टोबर (मंगळवारी) रोजी दुपारी 12 पासून सुरू होणार असल्याचे ऍमेझॉनने म्हटले आहे.

नवरात्रीपासूनच सणासुदीचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या या "ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'मध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, फॅशन, स्मार्टफोन्स, ग्रोसरी, सौंदर्य प्रसाधने अशा विस्तीर्ण श्रेणीतील विविध ब्रॅंडच्या वस्तूंवर आतापर्यंतची सर्वाधिक सवलत मिळणार आहे.
ग्राहकांना विनाअडथळा ऑनलाइन शॉपिंगचा आंनद घेता यावा, यासाठी ऍमेझॉन इंडियाने संपूर्ण यंत्रणा विकसित केली आहे. ऍमेझॉन इंडियाने 100हून अधिक ब्रॅंडशी करार केला आहे. कुटुंबीयांसाठी आणि मित्र परिवारासाठी ऍमेझॉन इंडियाच्या वेबसाईटच्या आणि ऍपच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तब्बल 17 कोटी वस्तू खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या सेलमध्ये चार लाख विक्रेत्यांचा सहभाग असून, तेरा राज्यांमधील पन्नास वितरण केंद्रांमधून ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या वस्तू पुरवल्या जाणार आहेत. या केंद्रांची एकत्रित साठवणूक क्षमता 20 दशलक्ष क्‍यूबिक फूट आहे.

या सेलच्या काळात ऍमेझॉनकडून ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार वस्तूंची डिलिव्हरी दिली जाणार आहे. यामध्ये खरेदीच्या दिवशी, खरेदी केल्यावर दोन दिवसांमध्ये, रविवारी किंवा सकाळच्या वेळी अशा सोयीनुसार वस्तूंची डिलिव्हरी केली जाणार असल्याचे कंपनीचे म्हटले आहे. ऍमेझॉन पे ईएमआय, डेबिट आणि क्रेडिट कार्ड ईएमआय, नो कॉस्ट ईएमआय, कॅश ऑन डिलिव्हरी, बजाज फिनसर्व्ह कार्ड, तात्काळ सवलतीसारखे पर्याय ग्राहकांना निवडता येतील. कॅशलेस पर्यायाने शॉपिंग करणाऱ्यांना जादा सवलतींचा फायदा मिळणार असून एसबीआय डेबिट अथवा क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास ग्राहकांना तात्काळ 10 टक्‍क्‍यांची सवलत मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ऍमेझॉन पे बॅलन्स टॉपअप केल्यास 300 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

ऍमेझॉन ग्राहकांसाठी ऍमेझॉन पे ईएमआय हा पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यात ग्राहकांना वस्तूंच्या खरेदीसाठी तात्पुरते कर्ज मिळणार आहे. कोणतेही अतिरिक्‍त शुल्क न देता तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत ग्राहक या कर्जाची परतफेड करता येईल. डेबिट कार्डधारकांसाठी कंपनीने "ईएमआय'वर खरेदीची सुविधा देऊ केली आहे.

एचडीएफसी बॅंक, ऍक्‍सिस बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंक या तीन बॅंकांचे डेबिट कार्डधारक या योजनेसाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर बजाज फायनान्स कार्डधारक आणि आघाडीच्या बॅंक ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय सुविधा देण्यात आली आहे. इन्स्टंट बॅंक डिस्काउंट यापुढेही सुरूच राहणार आहे.

शंभराहून अधिक शहरांमध्ये वस्तू बदलून घेण्याची (एक्‍स्चेंज) सुविधा असल्याचे ऍमेझॉन इंडियाने म्हटले आहे.

Web Title: Great Indian Festival Sale by Amazon