'जीएसटी' विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. आज (सोमवार) अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटीसंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

मुंबई - महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.

केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. आज (सोमवार) अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटीसंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.

Web Title: 'GST' bill approved Legislative Assembly in Maharashtra