पालकमंत्री एकनाथ शिंदेंची गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील परिसराला भेट

सकाळ न्यूज नेटवर्क 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगढ सीमेला लागून असलेल्या संवेदनशील प्रदेशाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. .

मुंबई - गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगढ सीमेला लागून असलेल्या संवेदनशील प्रदेशाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. .

दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी आज दुसऱ्या दिवशी सिरोंचा, अहेरी, पाटापुडम आदी नक्षलग्रस्त प्रदेशांना भेट देण्याचा निर्णय घेतला. यातील काही प्रदेश छत्तीसगडला लागून असून नक्षलवादी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखले जाते.

WHO नंतर वॉशिंग्टन पोस्टकडून मुंबई पालिकेसह धारावी पॅटर्नचं तोंडभरुन कौतुक

नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर असून आज, रविवारी त्यांनी सिरोंचा तालुक्यातील पात्तागुडम पोलिस स्टेशनला भेट दिली. तेथील पोलिस बांधव आणि एसआरपीएफ आणि बीएसएफ जवानांच्या वसतिगृहाची आणि कॅन्टीनची पाहणी केली; तसेच तेथील स्थानिक रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाऊन घेतल्या. येथे काही काळापूर्वी नक्षलवादाची कास सोडून आत्मसमर्पण केलेल्या दोन कुटुंबांना शिंदे यांनी आर्थिक मदत केली.

तसेच पोलीस स्टेशनच्या लगतच असलेल्या इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाची देखील पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक सिघला, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे,  मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद हे उपस्थित होते.

------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Eknath Shinde visits sensitive areas in Gadchiroli district